बळीराजा स्वप्न पाही,
कापसाच्या पैशावर,
यंदा मुलीचे लग्न करीन,
सावकाराचे कर्ज फेडीन,
थोडी मौजमजा करीन.......
... प्रत्यक्षात,
कापूस विकून पैसा हातात येई,
पैसा बघून त्याचे डोळे पांढरे होई
हातातील पैशाचा व होणाऱ्या खर्चाचा ,
ताळमेळ न होई........
६ एकरातील एकूण खर्च -१,००,०००रु.,
पैसे आले-१,८०,०००.रु.
खर्च वजा जाता,हातात उरले-८०,०००रु.
पुढील खर्च ,घर खर्च ,मुलीचे लग्न, सावकाराचे देणे,
असे अनेक प्रश्न डोक्यात येई,
त्याची मेहनत तर फुकट जाई.
त्याच्या स्वप्नांचा चुराडा होई......
'branded' कॉटन रेडीमेड कपड्यांना,
प्रिंटेड भाव येई,
वर्षभर राबराब राबून ,
शेतात पिकणारा 'कॉटन'मात्र,
कवडीमोल जाई....
निसर्गाची लहर,
राजकारण्यांची खेळी,
व्यापाऱ्यांची भाजते पोळी,
बळीराजाचा जीव जाळी,
त्याच्या आयुष्याची होई होळी,
शेवटी,
हतबल बळीराजाचा जाई बळी............
Wednesday, March 21, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment